top of page

​आमचे ध्येय

श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम हे केवळ आध्यात्मिक नाही तर समाजाच्या प्रत्येक स्तरावर आपली कामगिरी बजावत आहे. संस्थेचे सर्व सदस्य एक जागरूक नागरिक आणि देवीचे सेवक म्हणून आपल्याला कर्तव्याशी एकनिष्ठ आहेत. अध्यात्म आणि भौतिकता या दोन्ही गोष्टींना सोबत घेऊन एक नवीन समाज निर्माण करण्याचे कार्य श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम च्या माध्यमाने आई जगदंबा करवून घेत आहे.  

श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम - उपासना

​सर्वांची आध्यात्मिक प्रगती करणे

​घराघरामध्ये प्रत्येकाला सनातन वेदिक धर्मा बद्दल जागरूक करून, मंत्र सेवा, साधना, उपासना योग्य मोफत मार्गदर्शन देऊन करवून घेऊन त्यांच्या आध्यात्मिक आणि भौतिक समस्या सोडवने. 

श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम - गोशाळा

गो माते चे पालन आणि रक्षण

सर्वांच्या सहयोगाच्या माध्यमातून गोशाळा स्थापना आणि गोपालन, केवळ गोशाळा नाही तर सर्व मुकप्राण्यांची सेवा करण्याचे ध्येय संस्थेचे आहे.

श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम - अन्नछत्र

सर्वांसाठी अन्नछत्र

समाजातील सर्वांसाठी मोफत अन्नदान सेवा सुरू करणे. या सेवेद्वारे गरीब आणि गरीब लोकांना व्यापकपणे मदत मिळवणार आहे. जसे आई जगदंबेने पोट दिले आहे तर प्रत्येक पोटाला अन्न पण ती कोणाच्या न कोणाच्या माध्यमाने पुरवणारच हा विश्वास घेऊन ही सेवा आम्ही सुरू केली आहे. 

श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम - अंधश्रद्धा निर्मूलन

समाजातून अंधश्रद्धा काढून श्रद्धा पसरवणे

केवळ अंधश्रद्धेचा विरोध न करता, श्रद्धा आणि अंध-श्रद्धा काय असते हे प्रात्यक्षिकरित्या आध्यात्मिक अनुभव देऊन समजावले जाते. आणि सनातन धर्माचे विज्ञान प्रत्येक घरात पोहोचवले जाते. 

श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम - स्त्रीशक्ति जागरण

स्त्रीशक्ति जागृत करणे

समाजात होणाऱ्या स्त्रियांवरील अत्याचार कमी करणे, स्त्रियांना रोजगाराची संधि उपलब्ध करून देणे, सुप्त कला गुणांना वाव देऊन त्यांना सक्षम बनवणे.  

श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम

​मंदिर निर्माण कार्य

केवळ एक squere foot जमीन दान करून मंदिर निर्माण कार्यात महत्वाचे योगदान द्या. या मंदिरात आई जगदंबेची स्थापना करून तिची करुणा तिच्या प्रत्येक भक्ता पर्यन्त पोहोचवणे हे ध्येय आहे. हे मंदिर भविष्यात अनेक रंजल्या-गांजल्यासाठी, माता, भगिनी आणि बालकांसाठी आश्रय बनेल. 

Subscribe to Site

Thanks for submitting!

bottom of page