
मनुष्य देह मिळाला आहे तर तो नक्कीच सार्थकी लागला पाहिजे म्हणजे सत्कर्म घडली पाहिजेत. कारण माणसे ओळखण्यात झालेली चूक ही आयुष्यभर नुकसान देते.
धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष हे मानवी आयुष्याचे चार प्रमुख स्तंभ आहेत. या सर्व स्तंभाची पूर्णता झाली पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात भौतिक आणि अध्यात्म यांच्याशी निगडित साधना केली पाहिजे. जे काही देवाचे आहे ते देवाला अर्पण केले पाहिजे.आपल्या मालकीचे सर्व काही हे त्याच्याच मालकीचे आहे. एकाग्रतेने गुणगुणलेले मनःपूर्वक मंत्रोच्चार, प्रेमाने गायलेले भजन, सुगंधी द्रव्यांचा अभिषेक आणि केवळ भक्तिभावाने केलेला यज्ञ हे सर्व काही त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजे.
हे वाचायला, ऐकायला सोपे वाटते ना पण आचरणात आणताना मात्र ततपप होते. किती बरबटून गेलो आहोत आपण या तांत्रिक युगात!! आपले आपल्याला तरी कळते का? एखादे यंत्र शरीरात टाकले असल्यासारखे आपण नुसते पळत असतो. काय उपयोग त्या पळण्याचा? काय साध्य होते त्यातून? शून्य !!! जन्माला आलेला प्रत्येकजण पैसा कमावण्यासाठी पळत असतो अगदी तहान भूक विसरून. पण ते तरी तो शांतपणे कमावतो का? पोटापुरते कमावण्याची लक्ष्मण रेषा तर त्याने कधीच ओलांडली.100 रुपये मिळाले की 200 रुपये मिळवण्याची लालसा! ही लालसा कशासाठी तर कर्जबाजारी झालो म्हणुन? पण ही पळवाट काढताना मात्र तो घरातील लक्ष्मी पूर्णपणे विसरून जातो. आपण कर्जबाजारी का झालो याचा काडीमात्रही विचार तो करत नाही. मान्य आहे की सांसारिक अडचण आहे, मुलांचे शिक्षण आहे, अचानक घरातील काही दुरुस्ती तोंड वर काढते, अचानक घरातील एखादी व्यक्ति आजारी पडते या सगळ्यासाठी पैसा लागतो. पण हा पैसा कधी कधी कर्ज काढून केला खर्च केला जातो आणि मग अव्वाच्या सव्वा पैसे परतफेड करण्यात जातात. खूप वेळा घरात येणारा पैसा टिकत नाही आणि मग अशावेळेस परत घरातील लक्ष्मीचे म्हणजे स्त्रीचे दागिने गहाण टाकले जातात. हे दागिने म्हणजे स्त्रीचा हक्क असतो, तिचे स्त्रीधन असते ते. स्त्री ही लक्ष्मी, उमा, सरस्वती असते, दागिना गहाण टाकणे म्हणजे घरातील लक्ष्मी आपण कर्जाच्या विळख्यात टाकतो. मग कशी येईल लक्ष्मी परत आपल्या घरात?
प्राचीन काळात शांतता आणि आर्थिक सुबत्ता होती पण आत्ताच्या तांत्रिक युगात त्याची जागा वर्दळ आणि कर्जाने व्यापली. माणूस माणसापासून तुटला, घराघरातून भांडणे वाढीस लागली, पैशासाठी अनेक घरसंसार उध्वस्त झाले. 'असेल पैसा तर येईल हौस' अशी परिस्थिती निर्माण झाली. एकुलत्या एक मुलाला/मुलीला धंदा सुरू करून देण्यासाठी कर्ज काढतात पण आपल्या चालू असलेल्या धंद्याचे प्रशिक्षण मात्र देत नाहीत. कर्जाच्या विळख्यात अडकून धंदा पण जातो हातातून. आज मराठी माणूस केवळ यामुळेच मागे पडला आहे. कर्जबाजारी होऊन आत्महत्या सारखे प्रकार वाढू लागले आहेत.
या सगळ्या प्रकारात आपण मात्र देवाकडे दुर्लक्ष करतो आणि धावा करतो. पण हा त्रास कमी करण्यासाठी कोणताही साधना मात्र आपण करत नाही, बरोबर ना? कारण आपल्याला वाटते की आपण धावा करतोय म्हणजे तो आपला पैशाचा मार्ग मोकळा करेल.
आजच्या युगात पैसा खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. किंबहुना पैसा हेच सर्वस्व आहे. रोखीचा प्रवाह सातत्याने असणे गरजेचे आहे. जोपर्यंत भोग बद्दल माहिती मिळत नाही तोपर्यंत मोक्ष जाणून घेण्याची अपेक्षा फोल आहे. प्रत्येक व्यक्तीचे श्रीमंत होण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिवाचा आटापिटा केला जातो. कुणी सापाची कात घरी आणून ठेवते तर कुणी काळ्या घोड्याची नाळ आणून आपल्या तिजोरीत ठेवतात. कोणी अंगठी करून बोटात घालतात तर कोणी हजारो लाखो रुपये खर्च करून मांत्रिक कडून लक्ष्मी संबंधित विधी घरात करून घेतात. पण अशी जोर जबरदस्तीने आणलेली लक्ष्मी जास्त दिवस टिकत नाही. कारण तिला घरात स्थिर करून ठेवण्याचे तंत्राच कोणाला माहित नसते. तिची पूजा व्यवस्थित केली जात नाही. मग कस बर त्या लक्ष्मी आईने घरात विराजमान व्हायचे?
तुम्हाला तरी पटते का अशी लक्ष्मी? एक म्हण आहे फुकट ते पौष्टिक पण लोकांना तेही नको असते. तुम्हाला अस वाटतय ना स्वतःचे घर व्हावे, दारात चारचाकी उभी असावी, घरात येणारा जाणारा उपाशी जाऊ नये, अडल्या नडला लोकांना आपल्याकडून काही मदत व्हावी, आपल्या घरात लक्ष्मी कायम स्थिर व्हावी, प्रसन्न राहावी...चला तर मग कसला विचार करताय एवढा...या आमच्या शक्तिपीठ मध्ये आणि घ्या सगळ्या मोफत साधनांचा अनुभव...हो हो, तुम्ही जे वाचताय ते बरोबर आहे 'मोफत' अगदी मोफत एक रुपया पण खर्च नाही!!! बघा कशी कळी खुलली तुमची!!! जाऊ दे मी सांगतेच तुम्हाला या साधनेची महती....
आमच्याकडे अखंड लक्ष्मी साधना अगदी मोफत दिली जाते. आता तुम्ही म्हणाल की अखंड म्हणजे कशी? तर एकदा तुम्ही ही साधना केलीत तर लक्ष्मी सतत तुमच्या घरी स्थिर राहील. हो पण ही साधना करताना काही अटी नियम पण आहेत त्याचे मात्र तंतोतंत पालन झाले पाहिजे. घाबरू नका या अटी नियम काही कडक नाहीत. फक्त ही साधना सात्विक आहे हे लक्षात घ्या. आता परत सात्विक म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल ना. जेव्हा तुम्ही या साधनेसाठी आमच्या संपर्कात याल त्यावेळेस आमच्या श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम च्या परमपूज्य गुरु रेवतीमाई आणि ISPDHAAM Foundation चे शिवांश जमदग्नि सर तुम्हाला सगळे सांगतील. किंबहुना त्यांनी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी एक पुस्तिकाच तयार करून ठेवली आहे. ग्रुप मध्ये आल्यावर तुम्ही ती पिडीएफ मिळवू शकता.
ही 63 दिवसांची साधना असून ती 21-21-21 अशी विभागली आहे. म्हणजे पहिल्या 21 दिवसात आई लक्ष्मीची विनवणी करायची, पुढच्या 21 दिवसात तिचे पूजन करायचे आणि शेवटच्या 21 दिवसात लक्ष्मी आईला घरात स्थिर कसे करायचे याचे मार्गदर्शन केले जाते.
या साधनेचा साधकाला खूप फायदा होतो. साधना सुरू केल्यानंतर साधकाला खूप चांगले अनुभव यायला सुरुवात होते. प्रत्यक्षात लक्ष्मी आई दृष्टांत देते, आपली खोळंबलेली कामे मार्गी लागतात, कुटुंबात शांतता आणि स्थैर्य निर्माण होते.
फक्त एकच आहे मानत कोणताही शंका न आणता ही साधना पूर्ण करायची. साधनेचे फळ तुम्हाला मिळतेच मिळते. साधना करताना जर काही अडचण आली तर मार्गदर्शन करण्यासाठी माई आणि शिवांश जमदग्नि सर आहेतच.
ही साधना शुक्रवार, अष्टमी किंवा पौर्णिमेला सुरू करू शकता. स्त्री पुरुष दोघेही ही पूजा करू शकतात. जीवनात अनेक प्रकारच्या मिळकतीचे मार्ग खुले होतात, नकळतपणे एखादी चांगली गोष्ट, चांगली नोकरी चालून येते, आर्थिक स्थिरता येऊ लागते, कुलदेवतेचा स्वप्नात दृष्टांत होतो.
कधी कधी साक्षात लक्ष्मी आईचे दर्शन होते. साधनेच्या कालावधीत जर कोणी सवाष्ण स्त्री घरी आली तर तिची ओटी भरावी, लहान लेकरे आली तर त्यांना काही तरी खाऊ द्यावा.
मंगळवार, शुक्रवार या दिवशी जमल्यास येणार्या सुवासिनी ला हळदी कुंकू चा मान देऊन दूध आणि चणे फुटाणे चा प्रसाद द्यावा. काहीच शक्य नसल्यास निदान साखर किंवा गुळाचा खडा देऊन तोंड गोड करावे.
हे सगळे सिद्ध अनुभव मी इथे नमूद करत आहे. व्यवसायातील यश, स्थिरता, सतत संपत्तीचा ओघ घरात येत रहावा या साठी ही साधना खूप उपयोगी आहे. जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तरी ही साधना उपयोगी ठरते.कारण ही साधना करता करताच अनेक नावीन्यपूर्ण संधी चालून येतात. ही साधना करत असताना शक्ति पीठ कडून देवीचे भस्म, सिद्ध कुंकू आणि प्रसाद पण पाठविला जातो.
मंडळी साधना तुमच्या समोर आहे आणि ती ही अगदी मोफत! तुम्हाला यश,स्थैर्य हवे असेल तर साधना सुरू करा आणि अनुभव घ्या.कारण या साधनेची मी जेवढी माहिती सांगेन तेवढी कमी आहे. तुम्ही साधना सुरू करा,अनुभव घ्या आणि सुखी व्हा!!!
मला तर एवढेच म्हणावेसे वाटते,
''सद्गुरु की महिमा अनंत,अनंत किया उपकार|
लोचन अनंत उघडिया, अनंत दीखावन हार ||''
मी साधनेचा अनुभव घेतलाय, तुम्ही पण घ्या. चला तर मग आपण साधना करूया!!
चला भेटू आता पुढच्या एका अशाच साधनेच्या माहितीसाठी....तोपर्यंत जय जगदंब!!!
हेमलता शहा - सपकाळ
सदस्या, पुणे
Unique ID : ISD01SPUF009983
Akhand Lakshmi Sadhana Vrat
Comments