महारुद्र भैरव अनुष्ठान | Maharudra Bhairav Anushthan | bhairav mantra
नमस्कार! कसे आहात? वाचताय ना! वाचायलाच पाहिजे तरच सगळे कळेल ना!!
चला तर मग आपण आता महारुद्र भैरव अनुष्ठान बाबत बोलूया!!
असं म्हणतात की माणूस जन्म हा एकदाच मिळतो तर मिळालेला जन्म हा सार्थकी लागला पाहिजे ना!!!
कर्म,ज्ञान आणि योग ही साधने आहेत तर भक्ती हे साध्य आहे.कर्म करताना भगवंताचा विसर पडतो तर ज्ञानी मनुष्य जगताला मायाकार मानतात. ज्ञानमार्ग माणसाला अभिमानाची बाधा होते आणि योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शांत होते.
प्रत्येकजण उदरनिर्वाहासाठी झटत असतो, पण त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला काहीच मिळत नाही. स्वतःच्या अवगुनांकडे दुर्लक्ष करून मनुष्य दुसऱ्याच्या अवगुणांकडे लक्ष देत असतो. का? कशासाठी? याचा विचारही तो करीत नाही. आपल्या मनाला येईल तसे तो वागत असतो, मनात येईल ते काम करत राहतो.त्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करत नाही. फक्त पैसा मिळवणे हाच त्याचा उद्देश असतो. एखाद्याचे घर बरबाद होत असेल तर त्याचीही त्याला फिकीर नसते. गतजन्मीची त्याची कर्म त्याला पुढे पुढे नेत असतात.
आजच्या या कलियुगात मनुष्य प्रचंड विचारांनी ग्रासलेला आहे, दिशाहीन झाला आहे. अवास्तव मागण्यांना तो त्रासून गेला आहे. घराघरात वादविवाद सुरू आहेत. भावाभावांमध्ये भांडणे चालू आहेत, संपत्तीसाठी नाहक बळी जात आहेत. गरीब श्रीमंत भेद वाढीस लागत आहे. आपल्यापेक्षा एखादा माणूस पुढे जात असेल तर त्याला येन केन प्रकारेण मागे खेचले जात आहे.
कधी विचार केलाय का की या सगळ्याला जबाबदार कोण? कुठे वेळ आहे आपल्याकडे विचार करायला? आपण फक्त तेल्याच्या घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे पळत असतो. तो बैल पण काहीच विचार न करता नुसता गोल गोल फिरत राहतो तसेच आपण पण एकामागे एक काम करत फिरत राहतो. दिवसामागून दिवस जातात, रात्रीमागुन रात्र सरते पण विचार करण्याची ताकद मात्र खुंटून जाते.
कधी कोणाची बुद्धी मंद होते तर कधी कोणी एकदम हुशार होतो, कधी हट्टा कट्टा असलेला एकदम बारीक होतो तर कधी श्रीमंतीत लोळणारा दरिद्री होतो, कधी कामात निष्णात असणारा एकटक आकाशाकडे नजर लावून बसतो तर कधी सतेज असणारा एकदम निस्तेज होतो.
मंडळी लक्षात येतंय का मी ही उदाहरणे का सांगतीये ते? नाही ना! अहो हे कलियुग आहे, या युगात फक्त एक दुसऱ्याची शांती हिरावून घेणे एवढेच काम आहे. कोणाची कोणाला काळजी नाही,' जो जगेल तो सूर्य बघेल ' अशी अवस्था झाली आहे. अन्न,वस्त्र,निवारा याची वाताहत! चांगल्या चांगल्या घरांची दयनीय अवस्था!! काळ फोफावला पण कसला तर अंधश्रद्धा आणि तांत्रिक मांत्रिक गोष्टींचा!!
तंत्र आणि मंत्र हे शिवाने लोकांच्या स्वताच्या प्रगती साठी बनवले पण लोक स्वतची प्रगती न करता या तंत्र आणि मंत्र चा उपयोग करून दुसऱ्यांच्या जीवनात समस्या निर्माण करण्याचे कार्य करत आहेत.
मला सांगा तुमच्यापैकी किती लोक असे आहेत जे ह्या तंत्र मंत्राचा आधार घेऊन यशस्वी जीवन जगत आहेत? पण ह्या तंत्र मंत्राचा भविष्यकाळात होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार केलाय का कधी? या तंत्र मंत्रामुळे एखाद्याच्या आयुष्यात खूप गंभीर परिणाम होतात.. होत्याचे नव्हते होऊन जाते. 'ना घर का ना घाट का' अशी अवस्था होऊन जाते. दोन वेळचे अन्नही त्याला मिळू नये अशी तजवीज हे तंत्र मंत्र करताना वापरतात. पूर्णपणे व्यक्तीला आयुष्यातून उध्वस्त करून टाकतात. लाखो करोडो रुपये खर्च करून तंत्र मंत्र विकत घेतले जातात. पण विकत देणारा आणि विकत घेणारा दोघेही नंतर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार मात्र करत नाही.
या कलियुगात सगळेच गलितगात्र आहेत. कोणाच्याही घरात,जीवनात स्थैर्यता नाही. मनात अनेक प्रकारचे विचार घर करून उभे असतात आणि भीतीने ग्रासलेले असतात. अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कित्येकदा अवर्णनीय अश्या तंत्रप्रयोगला बळी पडलेल्यांच्या मानसिक समतोल ढळतो. शत्रुत्व वाढीस लागते, त्यातून खून खराबा करून कोर्टाची पायरी चढावी लागते. वर्षानुवर्षे खटले चालत राहतात का तर परत त्यावर पण तंत्रप्रयोग करून घेतलेला असतो म्हणून. काही वेळेस तर देवाचे बंधन केले जाते म्हणजे आपण करत असलेली पूजा - अर्चा देवापर्यंत पोहोचू नये म्हणून तंत्र मंत्राची भिंत उभी केली जाते. अनेकदा या तंत्रप्रयोगतून एखादी वस्तू तंत्र केलेल्या व्यक्तीच्या घरी पाठविली जाते जीच्याद्वारे त्या व्यक्तीची सर्व माहिती मांत्रिकाला मिळत राहते आणि तो अजून त्या व्यक्तीला उद्वस्त करण्याचा प्रयत्न करतो.अनेकदा यामुळे जीव गेल्याच्या घटना आपण ऐकत असतो.काळी विद्या,जादूटोणा या जीवघेण्या प्रकारातून व्यक्ती बाहेर येईपर्यंत त्याच्या अंतिम श्र्वासाची तयारी झालेली असते म्हणजे तो अनंताच्या प्रवासाची तयारी करत असतो. घडतंय ना मंडळी हे सगळे आपल्या आयुष्यात किंवा आपल्या आजूबाजूच्या परिचयात. आपल्यापैकी कित्येक लोक याचे बळी ठरले असतील. पण जर आपण ठरवले तर या गोष्टींना शह देऊ शकतो. नकारात्मक काळ्या शक्तीपेक्षा दैविक शक्तीचा नक्कीच फायदा होतो.
मंडळी हे सत्य आहे बरं का!! आपण आता अशाच एका तोडग्याची माहिती घेणार आहोत ज्याचे नाव आहे 'महारुद्र भैरव अनुष्ठान ' जे पूर्णपणे दैवी आहे. शास्त्रामध्ये अस सांगितल आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवन केल्याने आणि द्वापरयुगमध्ये देवता अर्चनाने भगवंताची प्राप्ती होते.परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने नुसत्या नामस्मरणाने देखील भगवंताचे दर्शन होते.
साडेतीन कोटी जप केला तर चित्तशुद्धी आणि तेरा कोटी जप केला तर भगवंताचे दर्शन होते पण आपल्याला हे शक्य नाही.
ISPDHAAM Foundation यांनी यावर महारुद्र भैरव अनुष्ठान सारखी साधना आपल्याला मोफत उपलब्ध करून दिली आहे.
ही साधना खूप अप्रतिम आहे.कोणी तुमच्यावर काळी जादू करू दे किंवा कोणी तुमचे लक्ष्मी बंधन करू दे हे अनुष्ठान सुरू केले की हळूहळू सर्व गोष्टी सुटत जातात, मार्ग मोकळे होतात, घरात असणारी नकारात्मकता निघून जाते, लक्ष्मी बंधन तुटते.
खूप साधक आजच्या घडीला ही साधना करून आपले जीवन सफल करीत आहेत. ही साधना संध्याकाळी ९.०० नंतर करायची असते. एकच वेळ, एकच आसन आणि एकच जागा हे महत्वाचे आहे. साधना करायला सुरुवात केली की त्याचे अनुभव येतात. सुरुवातीला थोडा त्रास होतो कारण नकारात्मकता बाहेर पडत असते. पण जसजसे आपण या साधनेत पुढे पुढे जात असतो तसतसे आपल्याला अजून चांगले चांगले अनुभव येत राहतात.
फक्त शांत मनाने जप करत राहायचा, भैरवनाथ स्वतः दर्शन देतात. जप करत असताना मध्येच १०-२० सेकंद एक अनामिक सुगंध येतो. कारण आपण जप करत असताना ते हजेरी लावतात असा माझा अनुभव आहे. मी स्वतः गेले २ महिने हे अनुष्ठान करत आहे आणि माझ्या स्वतःकडे खूप अनुभव आहेत. या अनुष्ठानाने काही गोष्टींचे कोडे उलगडायला सुरुवात होते. कोणी जर तांत्रिक क्रिया केली असेल तर ती या अनुष्ठानाने तुटून पडते.
ह्या अनुष्ठान चा कालावधी १५१ दिवसाचा आहे. पण एवढे मात्र खरे की हे अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत व्यक्ती सगळ्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडून एक नवीन जीवन जगायला सुरुवात करते. कमावण्याचे बंद झालेले मार्ग खुले होतात, नकारात्मकता दूर होऊन सुखाची हिरवळ दिसू लागते. यशाच्या पायऱ्या मोकळ्या करते, भुतबाधेसारख्या इतर कोणत्या बाधा असतील तर त्या निघून जातात. अनपेक्षित धन मिळण्याची शक्यता असेल तर तेही मिळते. ज्यांना शनी साडेसातीचा त्रास आहे त्यांनी हे अनुष्ठान जरूर करावे. महारुद्र भैरव भक्तांचे सर्व अडथळे दूर करून जीवन सुलभ आणि सुरळीत करतात. अनेक वाईट शक्ती, विनाशकारी घटनांपासून रक्षण करतात. कालष्टमीच्या दिवशी हे अनुष्ठान सुरू करता येते.
चला तर मग करणार ना तुम्ही हे अनुष्ठान सुरू!! अहो अगदी मोफत आहे हे, एकही रुपया खर्च न करता!!! मग व्हा जॉइन आमच्या ISPDHAAM Foundation आणि करा सुरू अनुष्ठान, घ्या अनुभव स्वतः!!
महारुद्र भैरव अनुष्ठान | Maharudra Bhairav Anushthan | bhairav mantra
श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम च्या गुरू रेवतीमाई आणि ISPDHAAM Foundation चे शिवांश जमदग्नि सर आहेतच मार्गदर्शन करायला! ह्या दोघांसारखे गुरू लाभणे म्हणजे खरोखरच सौभाग्य आहे. सर्व अनुष्ठान संबंधी माहिती तुम्ही जॉइन झालात की मिळेलच! चला जॉइन व्हा आणि अनुष्ठान सुरू करा!
आज आपण इथेच थांबू! लवकरच भेटू अशाच प्रकारच्या अजून काही साधनांची माहिती घेण्यासाठी....तोपर्यंत जय महाकाळ!जय भैरवनाथ!!
"अकाल मृत्यू वो मरे,जो कर्म करे चांडाळ का|
काल उसका क्या बिगाडे,जो भक्त हो महाकाल का!!"
जय महाकाळ🙏🙏🙏
हेमलता शहा - सपकाळ
सदस्या, पुणे
Unique ID : ISD01SPUF009983
Comments