top of page

श्री स्वामी समर्थ तारकमंत्र | Shri Swami Samarth Tarak Mantra Lyrics


श्री स्वामी समर्थ तारकमंत्र | Shri Swami Samarth Tarak Mantra Lyrics
श्री स्वामी समर्थ तारकमंत्र | Shri Swami Samarth Tarak Mantra Lyrics

अक्कलकोट स्वामी समर्थ तारकमंत्र


निःशंक हो, निर्भय हो, मनारे

प्रचंड स्वामीबल पाठिशी रे

अतर्क्य अवधूत हे स्मर्तु गामी

अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥ १ ॥


जिथे स्वामीपाय तिथे न्यून काय

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय

आज्ञेविना काल ना नेई त्याला

परलोकिही ना भीती तयाला ॥ २ ॥


उगाचि भीतोसि, भय हे पळू दे

जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे

जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा

नको घाबरू तू असे बाल त्यांचा ॥ ३ ॥


खरा होई जागा तू श्रद्धेसहीत

कसा होशी त्यावीण तू स्वामिभक्त

कितीदा दिला बोल त्यांनीच हात

नको डगमगू स्वामी देतील साथ ॥ ४ ॥


विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ

स्वामीच या पंच प्राणामृतात

हे तीर्थ घे, आठवी रे प्रचीती

न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ॥ ५ ॥


॥ भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ॥


Shri Swami Samarth Tarak Mantra Lyrics

0 comments

Comments


Contact information

Contact 

+91 7028177950

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
  • Instagram
bottom of page