इच्छापूर्ति विशेष त्रिलोचन उपासना - Icchapurti Vishesh Trilochan Upasana ( Shiv Sadhana )
पौराणिक कथा
ही कथा शास्त्रात असलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे. एकदा श्री हरी विष्णु वर खूप मोठे संकट आले होते. ज्यावर कोणताही उपाय न मिळाल्याने शेवटी त्यांनी ही त्रिलोचण उपासना केली होती. तेव्हा श्रावण सुरू होते. आणि श्रावण मास च्या पहिल्या सोमवार पासून ही उपासना श्री हरी विष्णुंनी सुरू केली होती. या साठी त्यांनी कमळ पुष्प चा अभिषेक करण्याचा संकल्प घेतला होता. आता एकदा संकल्प घेतला तो पूर्ण करावा लागतोच. म्हणून महादेवांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी शेवटी एक फूल लपवून ठेवले. आणि अशी परिस्थिति होती की विष्णु एकदा संकल्प घेऊन बसल्यावर कमळ शोधून आणण्यासाठी उठू शकत नव्हते. आणि शोधू ही शकत नव्हते. पण कोणत्याही परिस्थिति मध्ये जो संकल्प घेतला तो पूर्ण केलाच पाहिजे न? म्हणून त्यांनी निर्णय घेतला आणि म्हटले की ' हे महादेवा, माझे एक नाव कमलनयन म्हणजेच ज्याचे नेत्र कमळा सारखे सुंदर आहेत म्हणून मी कमळ पुष्प ऐवजी माझ्या एका डोळ्याला तुमच्या शिवलिंग वर अर्पित करून माझा संकल्प पूर्ण करत आहे. आणि त्यांनी तसे केले सुद्धा. आणि या समर्पण भाव ला प्रसन्न होऊन महादेव श्री विष्णु समोर आले आणि त्यांनी विष्णुचा डोळा परत पूर्ववत करून त्यांना सुदर्शन चक्र भेट म्हणून दिले. आणि त्या सुदर्शन चक्राच्या सहाय्याने श्री हरी विष्णुंनी देवतांवर आलेल्या संकट दूर केले. आणि सुदर्शन चक्र धारण केले म्हणून त्यांचे चक्रधारी म्हणून नामकरण झाले.
या नंतर हीच त्रिलोचण उपासना श्री रामांनी रामेश्वर मध्ये केल्याचा उल्लेख आहे. जेव्हा त्यांना रावणा वर विजय प्राप्त करायचा होता तेव्हा त्यांनी ही उपासना केली. आणि त्याची ठिकाणी आज बारा ज्योतिर्लिंग पैकी एक रामेश्वरम म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच रामेश्वर ज्योतिर्लिंग ची स्थापना श्री रामांनी त्रिलोचण उपासना करून केली होती. जशी परीक्षा श्री हरी विष्णूची झाली तशीच श्री रामांची सुद्धा झाली. आणि रामांना त्यांच्या आई राजीवलोचन या प्रेमळ नावाने हाक मारायच्या. म्हणून त्यांनीही स्वतच्या डोळ्याला शिवलिंग वर अर्पित करून संकल्प पूर्ण केला. आणि त्या नंतर तर तुम्ही जाणताच की विजयश्री कोणाला मिळाली. आज ही रामेश्वरम शिवलिंग वर अनेक भाविक ही उपासना करण्यासाठी जातात.
ही उपासना एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी केली जाते. या उपासने चे अनन्य साधारण महत्व आहे. संकट काळा मध्ये या उपासने ला पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्ति ची इच्छा महादेव पूर्ण करतात. जसे सोळा सोमवार व्रत आहे तसेच हे व्रत अत्यंत चमत्कारी आणि गुप्त असे आहे. याचे पूर्ण विधान खाली दिले आहे. ॐ नमः शिवाय
त्रिलोचन उपासना करण्याचे लाभ
सर्व पाप पासून मुक्ती मिळते
असाध्य रोग सुद्धा बरे होतात असे अनुभव आहेत.
मनुष्याचा भाग्योदय नक्कीच होतो
अशुभ ग्रह शांत होऊन शुभ फळ देण्यास सुरू होतात.
मंगळदोष, कालसर्प दोष निघून जातात.
ही उपासना केल्याने केवळ शुभ फळ प्राप्त होतात.
व्यक्ति मागे काही दैवी दोष, श्राप असतील तर त्यातून मुक्ती मिळते.
अश्वमेघ यज्ञ करण्याचे फळ ही उपासना केल्याने मिळते
श्रावण मास मध्ये ही उपासना सुरू केल्यास अनन्य फळ मिळते.
मृत्यू नंतर शिव लोकांत स्थान ही उपासना करणाऱ्याला मिळते
धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार ही पुरुषार्थ ही उपासना केल्याने मिळतेच.
ही उपासना सात्विक असल्याने सर्वांसाठी करण्यायोग्य आहे
आपले टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि मिळवा अशाच अनेक सेवा उपासना साधना आणि अनुष्ठान
उपासनेचे नियम
दर सोमवारी २ तास मौन व्रत धारण करावे.
सोमवारी शुभ्र पांढरे वस्त्र घालावे.
व्रतस्थ असताना केवळ फलाहार घ्यायचा आहे. रताळे किंवा उकडलेले आलू चालतील.
अनुष्ठानच्या वेळी भूमी शयन करावे.
कोणाची निंदा करू नये आणि मोठ्या आवाजात बोलू नये भांडू नये.
घरात सर्वांशी गोड बोलावे वाद करण्यापासून लांब राहावे.
ॐ नम: शिवाय या मंत्राचा मनात जप दिवस भर चालू ठेवावा.
ब्रह्म चर्याचे व्रत सोमवारी पालन करावे
मांसाहार आणि मद्यपान करू नये
सोमवारी फळ खावीत, जर आरोग्य संबंधी तक्रार असेल तर जेवण करू शकता व्रत अनिवार्य नाही.
पूजा साहित्य
पांढरे वस्त्र, शिवलिंग, भस्म, रुद्राक्ष माळा, बेल पान , पांढरे फूल, पंचामृत, नारळ -1, एक सुपारी, रुई चे वस्त्र, कपूर, गाईच्या तुपाचा दिवा, धूप, नैवेद्य साठी दूध साखर, श्रीखंड किंवा पंच मेवा, किंवा पांढरी मिठाई
त्रिलोचन उपासना विधि
सोमवार च्या दिवशी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात एक चमचा दूध घालून स्नान करावे.
मनात ॐ नम: शिवाय चा जाप सुरू ठेवावा.
पहिल्या दिवशी सोमवारी जवळच्या शिव मंदिरात जाऊन महादेवाला बेलाचे पान वाहून आमंत्रण देऊन यायचे आहे की ' हे महादेवा आज तुम्ही आमच्या घरी या आणि आम्ही केलेली सेवा स्वीकार करा.'.
घरी येऊन सर्व सामग्री सोबत घेऊन बसा म्हणजे काही राहिल्यास तुम्हाला उठायची गरज पडू नये.
ही पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता.
ज्यांच्या कडे शिवलिंग नाहीये त्यांनी शिवलिंग रेती पासून निर्मित करायचे आहे त्यात थोडी माती वापरली तरी चालेल.
(रेती पासून बनवलेल्या शिवलिंगवर अभिषेक करताना फुलाच्या सहाय्याने थेंब थेंब अभिषेक करावा जास्त नाही.)
ज्यांच्या कडे शिवलिंग आधी पासून आहे त्यांनी त्याच शिवलिंगावर अभिषेक करायचं आहे नवीन निर्मित करण्याची आवश्यकता नाही.
उपासना करण्यासाठी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे मुख करून बसावे.
एका चौरंग वर नवीन पांढरे वस्त्र अंथरूण त्यावर निर्मित केलेले शिवलिंग/ किंवा घरातले शिवलिंग स्थापित करावे.
आधी गणेशाला वंदन करून उपासना निर्विघ्न पार पडावी या साठी प्रार्थना करावी.
मग गुरु ला वंदन करून उपासना करण्याची अनुमति आणि उपासने मध्ये यश मिळावे या साठी आशीर्वाद मागावा.
यानंतर तुमची जी पण इच्छा आहे ती उजव्या हातावर थोडेसे पानी, अक्षता घेऊन मी _____________ इच्छा पूर्ण होण्यासाठी ही त्रिलोचन उपासना करत आहे कृपा करून ती स्वीकार करून आशीर्वाद द्या अशी विनंती करून उपासना करण्यास आरंभ करावा.
सर्वात प्रथम ॐ नम: शिवाय या मंत्राने ११ वेळा अभिषेक करावा.
त्या नंतर ॐ हंस सोहं परम शिवाय नमः या मंत्राने १०८ वेळा अभिषेक करावा.
त्या नंतर ॐ हंस सोहं परम शिवाय नमः या मंत्राने २१ वेळा अभिषेक खालील पैकी कोणत्याही एक वस्तु ने करावा.
शिव मंत्र
ॐ हंस सोहं परम शिवाय नमः
विद्या प्राप्ति साठी – 21 इलायची(वेलची)
धन प्राप्ति साठी – पिस्ता, बादाम, खडी साखर (21)
स्वास्थ्य साठी – लवंग , बादाम (21)
प्रतिष्ठा साठी – काजू , इलायची (21)
शादी साठी – (हळदी च्या गाठी आणि सुपारी )
नौकरीसाठी – अक्षता, खडी साखर, चांदी चे बेल पान (२१)
शिव कृपा प्राप्ति साठी – बेल पान, पांढरे फूल (21)
कौटुंबिक सौख्य मिळण्यासाठी – पानी, दूध, २ तास
शत्रू बाधा शांत करण्यासाठी – ऊसाच्या रसचा अभिषेक
विजय प्राप्ति साठी – पंचामृत अभिषेक, पांढरे पुष्प, काजू, अक्षता
चार पुरुषार्थ प्राप्ति साठी – कमळ पुष्प (21)
हे व्रत सलग ३१ सोमवार करायचे आहे आणि अशीच पूजा दर सोमवारी करायची आहे.
पूजा पूर्ण झाल्यावर शिव सहस्र नामावली चा एक पाठ बसल्या जागेवर करायचा आहे.
उद्यापन पूर्ण होई पर्यन्त रोज किमान एक वेळा शिव सहस्र नामावली चा पाठ न चुकता करायचा आहे.
पूर्ण आठवड्यात इतर दिवशी मनात ॐ हंस सोहं परम शिवाय नमः या शिव मंत्राचा जप करत राहायचे आहे.
अशा प्रकारे ही त्रिलोचन उपासना संपूर्ण होते.
उद्यापन करण्याची विधी
ज्या सोमवारी ३१ सोमवार पूर्ण होतील त्या दिवशी एखाद्या महादेवाच्या मंदिरात जाऊन नंदी ला, गाईला अन्नदान करा.
एखाद्या मंदिरात आपल्या इच्छे नुसार डाळ-भात-शिरा-फळ दान करा. एखाद्या मंदिराचे किंवा गोशाळे च्या निर्माण कार्यात आपले योगदान, श्रमदान द्यावे.
उद्यापन च्या दिवशी हे व्रत करण्यास इतरांना सुद्धा प्रेरित करावे.
Icchapurti Vishesh Trilochan Upasana ( Shiv Sadhana )
Comments